Vrishika Mehta: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्री वृषिका मेहताने (Vrishika Mehta) तिचा प्रियकर सौरभ घेडियासोबत लग्न केले आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. ‘दिल दोस्ती डान्स’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोद्वारे चाहत्यांच्या मनात वृषिका मेहताने स्थान निर्माण केले. अभिनयासोबतच वृषिकाने डान्सने लोकांना वेड लावले आहे.
वृषिका मेहताने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात कॅप्शनमध्ये तिने एक संस्कृत श्लोक “भवद्भिः सह सङ्गतिः आजीवनं तिष्ठतु… सर्वेषु कार्येषु सफलतां जनयतु।” लिहिला आहे. वृषिकाने यापुर्वी तिच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. वृषिका आणि सौरभने 11 डिसेंबर 2022 रोजी साखरपूडा केला होता.
View this post on Instagram
लग्नसोहळ्यादरम्यान, वृषिकाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता तर सौरभने राखाडी शेरवानी घातली होती. या व्हायरल फोटोंमध्ये दोघांच्या कुटुंबाची झलकही दिसली आहे. वृषिकाचा नवरा सौरभ घेडिया हा टोरंटोमध्ये राहतो. सौरभ हा व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता आहे. वृषिका सौरभला सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटली होती. वृषिकाने अहमदाबादमध्ये एंगेजमेंट केली होती.
View this post on Instagram
वृषिकाला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये विशेष भूमिका मिळाली, जी तिच्यासाठी खूप फायदेशीर ठरली. याशिवाय ती ‘दिल दोस्ती डान्स’, ‘ये है आशिकी’, ‘इश्कबाज’ आणि ‘ये तेरी गलियाँ’ या मालिकेतही दिसली होती. वृषिका मेहता तिच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त अनेक डान्स शोमध्ये दिसली आहे. ‘दिल दोस्ती डान्स’ या शोमधूनही वृषिकाला ओळख मिळाली. या शोमधील तिच्या नृत्याने तिचे कौशल्य तिने दाखवले.