सोमेश्वरनगर – प्रति सोरटी सोमनाथ मंदिर करंजे (ता. बारामती) येथे श्रावण महिन्यातील यात्रा गुरुवारी (दि. 1 ऑगस्ट) पासून सुरू होत असून यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी देवस्थानासह पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. तर यात्रेसाठी छोटे-मोठे व्यापरी, हॉटेल व्यावसायिक, खेळाचे साहित्य दाखल झाले आहेत.
श्रीक्षेत्र सोमेश्वर करंजे येथे श्रावण महिन्यात येणाऱ्या चारही सोमवारी मोठ्या प्रमाणात जगभरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे भाविकांना कोणत्याही अडीअडचणी येऊ नये यासाठी देवसंस्थान विशेष काळजी घेत आहे. तर येथील मोकळ्या मैदानात पाळणेवाल्यांनी पाळणे उभारले असून त्याच्या आसपास छोटे हॉटेल, फोटो दुकाने, खेळणीवाले, मिळाईवाले, छोटे-मोठे व्यावसायिकांनी दुकाने थाटले असल्याने गावात यात्रा सुरू झाल्याचा भास होत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने सर्व व्यावसायिकांचे उत्पन्न वाढिस मदत होणार असल्याने पाळणा व्यावसायिकाने नमूद केले.