कोलकाता – प्रख्यात अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मिथून चक्रवर्ती हे नुकतेच भाजपवासी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना राज्यात असलेला धोका लक्षात घेऊन ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे असे सांगण्यात येते. सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहेत. 70 वर्षीय मिथून यांनी आपल्या तृणमुल प्रवेशाच्यावेळी जी आक्षेपार्ह विधाने केली आहेत त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका-टिपण्णी केली जात आहेत. काही अर्वाच्य प्रतिक्रीयाही या संबंधात दिल्या गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने ही सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगण्यात येते.