इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2021-23) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव आठ विकेट्सवर 270 धावा करून घोषित केला. आता भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य आहे.
Innings Break!
Australia set a fourth innings target of 444.#TeamIndia‘s run-chase now underway 🙌
Scorecard ▶️ https://t.co/0nYl21pwaw#WTC23 pic.twitter.com/qbIKKbiXVU
— BCCI (@BCCI) June 10, 2023
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरी याने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. मिचेल स्टार्क यानेही 41 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय स्मिथ 34, लाबुशेन 41 यांनीही महत्वाचे योगदान दिले.
भारताकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. शमी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या तर सिराजने एक विकेट घेतली.