पुणे – सातारा येथे 13 आणि 14 मार्च रोजी आयोजित केलेले लेखक प्रकाशक साहित्य संमेलन करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तूर्तास स्थगित केले आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शहापुरी शाखेच्या वतीने त्याचे आयोजन केले होते, अशी माहिती आयोजक राजीव बर्वे, शिरीष चिटणीस आणि विनोद कुलकर्णी यांनी दिली.
परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर याच संस्थांचे यजमान पद कायम ठेवून संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.