WPL Live Cricket Score, GG vs RCB Women’s Premier League 2024 : आज, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 13 वा सामना खेळला जात आहे. गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्स संघाने 20 षटकांत पाच गडी गमावून 199 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आता 20 षटकांत 200 धावा करायच्या आहेत.
Innings Break!
The Gujarat Giants set a 🎯 of 2⃣0⃣0⃣ for #RCB!
Can they claim their first win of the season or we’re in for a high-scoring run chase 🤔
Scorecard 💻📱https://t.co/W8mqrR94WB#TATAWPL | #GGvRCB pic.twitter.com/GOHxndoTSf
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 6, 2024
सलामीला फलंदाजीला आलेल्या लॉरा वोल्वार्ड आणि बेथ मुनी यांनी स्फोटक फलंदाजी केली. या दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 78 चेंडूत 140 धावांची मोठी भागीदारी झाली. लॉराने 45 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. तर कर्णधार मुनी 85 धावा करून नाबाद राहिली. बेथ मुनीने 51 चेंडूंत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 85 धावा केल्या.
फोबी लिचफिल्डने 17 चेंडूत 18 धावा केल्या. तीला स्मृति मंधाना हिने धावबाद केले. यानंतर गुजरातला एका मागोमाग धक्के बसले. ॲशले गार्डनर पहिल्याच चेंडूवर बाद झाली तर डेलन हेमलता 1 धाव काढत बाद झाली. त्यानंतर बूथ मुनीने एक बाजू संभाळत धावसंख्या 199 पर्यंत नेली.
आरसीबीकडून गोलंदाजीत सोफी मोलिनक्स आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर एक फलंदाज धावबाद झाली.