Fastest Delivery In Women’s Cricket : पुरुष क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर आहे, ज्याने 2003 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. पण आता शोएब अख्तरसारखा वेगवान चेंडू टाकणारी महिला गोलंदाज क्रिकेटमध्ये पहायला मिळाली आहे.
सध्या महिला प्रीमियर लीग (WPL 2024) मध्ये खेळत असलेली दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू शबनीम इस्माइल हिने महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. ( Shabnim Ismail bowls fastest recorded ball in women’s cricket ) शबनिमचे हे यश पाहून तिला महिला क्रिकेटचा ‘शोएब अख्तर’ असं म्हणता येईल.
A historic day as Shabnim Ismail delivers the fastest delivery ever recorded in women’s cricket 🤯
Details 👇https://t.co/l6AWuDcSyt
— ICC (@ICC) March 6, 2024
शबनीम ( Shabnim Ismail ) महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. स्पर्धेच्या 12 व्या सामन्यात, तिने महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला, ज्याचा वेग ताशी 132.1 किमी होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात शबनीमने हा चेंडू फलंदाज मेग लॅनिंगविरूध्द टाकला. मेग लॅनिंग दिल्लीची कर्णधार आहे. मुंबईच्या गोलंदाजाने डावातील तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू ताशी 132.1 किमी या विक्रमी वेगाने टाकला, तो एक डॉट बॉल होता.
शबनीम इस्माईलबद्दल सांगायचे तर, ती दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅट खेळते. 35 वर्षीय शबनिमने आतापर्यंत 1 कसोटी, 127 एकदिवसीय आणि 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कालावधीत तिने कसोटीत 3, एकदिवसीय सामन्यात 191 आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 123 विकेट्स घेतल्या आहेत.