WPL Live Cricket Score, DC vs UPW Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूपी वॉरियर्सने दिल्लीसमोर विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत आठ गडी गमावून 138 धावा केल्या. ॲलिसा हेलीच्या नेतृत्वाखालील संघाची सुरुवात विशेष झाली नाही. यूपीची स्फोटक फलंदाज किरण नवगिरे दुसऱ्याच षटकात बाद झाली. तिला तीतस साधूने क्लीन बोल्ड केले. किरणने केवळ पाच धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार हेली 29 धावा करून बाद झाली. सात चेंडूंच्या आत संघाला तिसरा धक्का ताहिया मॅकग्राच्या रूपाने बसला. तिला अरुंधती रेड्डीने बाद केले. मॅकग्रा तीन धावा काढून बाद झाली.
Innings Break!
Deepti Sharma’s crucial fifty guides @UPWarriorz to 138/8 👌👌
Enough on the board or do you reckon the @DelhiCapitals will chase it down🤔
Scorecard 💻📱https://t.co/HW6TQgqctC#TATAWPL | #DCvUPW pic.twitter.com/dN8xiXMia6
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 8, 2024
यूपीची फलंदाजीची फळी दिल्लीच्या गोलंदाजीपुढे झुंजताना दिसत होती. ग्रेस हॅरिसने 14, श्वेता सेहरावतने चार, पूनम खेमनारने एक, सोफी एक्लेस्टोनने आठ धावा केल्या. यूपीला आठवा धक्का दीप्ती शर्माच्या रूपाने बसला जिने 48 चेंडूत 59 धावा केल्या. 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शिखा पांडेने तिला आपला बळी बनवले. तर सायमा ठाकूर आणि गौहर सुलताना अनुक्रमे पाच आणि एक धावा करून नाबाद राहिल्या.
WPL 2024 Most Sixes : सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप 5 खेळाडू….
दिल्लीकडून गोलंदाजीत तीतस साधू आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर शिखा, अरुंधती, जेस जोनासन आणि ॲलिस कॅप्सीने प्रत्येकी एक विकेट घेतली.