जुन्नर -जुन्नर तालुक्यात दोन दिवसांनगतर पुन्हा एकदा करोनाबाधितांचा आकडा शतकापार गेला आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 29 गावांमध्ये एकूण 136 करोनाबाधित रुग्ण आढळले.
वारुळवाडीत सर्वाधिक 17, त्याखालोखाल हिवरे बुद्रुक 14, जुन्नर नगरपालिका, ओतूर व आळेमध्ये प्रत्येकी 12, नारायणगाव 11, पिंपरी पेंढार 5, निमगावसावा, सावरगावमध्ये प्रत्येकी 4, बोतार्डे, ओझरला प्रत्येकी 3, केवाडी, औरंगपूर, निमगाव तर्फे महाळुुंगे, मंगरुळ, धालेवाडी, नेतवड, चाळकवाडी, बादशहा तलाव,
शिरोली बुद्रुक येथे प्रत्येकी 2, तर संतवाडी, वडगाव आनंद, राजूर नं. 2, आपटाळे, अणे, बेल्हे, पारगाव तर्फे आळे, साकोरी, मांजरवाडी, वडज, तांबे, आर्वी, डुंबरवाडी, वडगाव कांदळी, हापूसबाग, पिंपळगाव सिद्धनाथ, बांगरवाडी आणि पाडळीमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 7672 झाली असून, 6675 उपचारानंतर बरे झाले आहेत. 273 जणांचा या आजाराने बळी घेतला असून, 714 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.