सातारा -जिल्ह्यात काल (दि. 29) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, आणखी 804 नागरिक करोनाबाधित झाले असून, गेल्या 24 तासांमध्ये 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
गेल्या 24 तासांमध्ये दहा हजार 687 चाचण्या झाल्या असून, पॉझिटिव्हिटी रेट 7.52 टक्के, असा कमी आला; परंतु करोनाबळींची संख्या चिंताजनक आहे.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि कंसात आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – सातारा 208 (40516), कराड 188 (27691), खटाव 78 (19586), पाटण 70 (8502), फलटण 67 (28418),
कोरेगाव 54 (16805), जावळी 37 (8579), माण 32 (13191), खंडाळा 31 (11788), वाई 21 (12670), महाबळेश्वर 3 (4281) व इतर 15 (1340), असे आजपर्यंत एकूण एक लाख 93 हजार 367 करोनाबाधित आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या आणि कंसात आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – सातारा 6 (1237), कराड 5 (813), खटाव 4 (490), पाटण 2 (199), जावळी 1 (193),
माण 1 (261), वाई 1 (334), खंडाळा 0 (149), कोरेगाव 0 (383), महाबळेश्वर 0 (45), फलटण 0 (282), असे आजअखेर एकूण चार हजार 386 करोनाबळी आहेत.