Shah Rukh Khan : 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) भारताचा 6 गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवामुळे लाखो चाहत्याचं मन मोडलं आहे. या सामन्यादरम्यान घडलेल्या काही छोट्या-मोठ्या घटनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ( Shah Rukh Khan) आहे. शाहरुख त्याच्या कुटुंबीयांसोबत वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचला होता. यावेळी बॉलिवूडमधील इतरही बरेच सेलिब्रिटी मॅच पाहण्यासाठी आले होते. यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचाही समावेश होता.
View this post on Instagram
यावेळी आशा भोसले शाहरुख खानच्या ( Shah Rukh Khan) शेजारी बसल्या होत्या. शारुखने आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या हातातील रिकामा कप घेऊन एका व्यक्तीला दिला. व्हिडिओमध्ये, शाहरुख खान आशा भोसले यांना आणखी काही हवे आहे का? असे विचारतो, ज्याला आशा भोसले नकार देतात.
त्यानंतर अभिनेता या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आशा भोसले आणि जय शाह यांच्यामध्ये बसतो. हा व्हिडिओ समोर येताच फॅन्सकडून शाहरुख खानच्या नम्र स्वभावाचे आणि शिष्टाचाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. हा सामना पाहण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले होते.