Israel-Hamas War : एक महिन्याहून अजात दिवसांपासून सुरु असलेले इस्रायल-हमास युद्ध काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता या युद्धात येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात भारताकडे जाणाऱ्या इस्रायली मालवाहू जहाजाचे अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायलचे मालवाहू जहाज आणि दोन डझनहून अधिक क्रू मेंबर्सला हुथी बंडखोरांनी ओलीस ठेवण्यात आले. जेव्हा इस्रायलला घटनेची माहिती मिळाली तेव्हा हे जहाज तुर्कीतील कोर्फेजमध्ये होते आणि ते भारतातील पिपावावच्या दिशेने जात होते. या घटनेनंतर इस्रायल-हमास संघर्षामुळे प्रादेशिक तणाव नव्या सागरी आघाडीवर पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी,”त्यांनी इस्रायलचे जहाज अपहरण केले आणि त्यातील क्रू सदस्यांना ओलीस ठेवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यासोबतच “जोपर्यंत गाझामधील हमास शासकांविरुद्ध इस्रायलची मोहीम सुरू आहे तोपर्यंत ते आंतरराष्ट्रीय पाण्यात इस्रायलच्या मालकीच्या किंवा मालकीच्या जहाजांना लक्ष्य करत राहतील” असा इशारा या गटाने दिला आहे. बंडखोरांनी रविवारी तांबड्या समुद्रात इस्रायलशी जोडलेल्या जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिली.
गेल्या महिन्यात, हुथी बंडखोरांना महत्त्वपूर्ण सागरी शिपिंग मार्गावरून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाठवल्याचा संशय होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, अपहरण केलेल्या बहामास ध्वजांकित जहाजात बल्गेरियन, फिलिपिनो, मेक्सिकन आणि युक्रेनियन यांच्यासह विविध राष्ट्रीयत्वाचे 25 क्रू सदस्य होते, परंतु एकही इस्रायली नाही. नेतन्याहू यांच्या कार्यालयाने ‘गॅलेक्सी लीडर’ नावाच्या जहाजाच्या अपहरणाचा निषेध करत याला दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे.