ICC World Cup 2023 India vs Netherlands Match Live Score : विश्वचषक 2023 च्या 45व्या सामन्यात आज भारताचा सामना नेदरलँडशी होत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाला नेदरलँडविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात ही विजयी मोहीम कायम राखत देशवासीयांना दिवाळीची भेट द्यायची आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे तर नेदरलँड्स (IND vs NED) स्पर्धेतून बाहेर पडला आहे आणि हा त्यांचा शेवटचा सामना आहे.
रोहित, गिल आणि कोहली यांच्या अर्धशतकी खेळीनंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या झंझावती शतकाच्या जोरावर भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून 50 षटकात 410 धावा केल्या असून नेदरलँड्ससमोर विजयासाठी 411 धावाचं आव्हान आहे.
IND vs NED Match Live : नेदरलँड्सला पाचवा धक्का…
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा नेदरलँड्सनं 36 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या आहेत. तेजा हा सायब्रँडसोबत क्रीजवर आहे. सायब्रँड अर्धशतकाच्या जवळ आहे. नेदरलँड्स संघाने 144 धावांवर पाचवी विकेट गमावली. बुमराहने अगदी अचूक यॉर्कर मारत डी लिलीला क्लीन बोल्ड केलं. त्याने 21 चेंडूत 12 धावा केल्या.
विराटने काढली विकेट…
नेदरलँडची चौथी विकेट 111 धावांवर पडली. विराट कोहलीने विरोधी कर्णधाराला बाद केले. स्कॉट एडवर्ड्स 30 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. विराटने त्याला लोकेश राहुलकडे विकेटच्या मागे झेलबाद केले.
A searing yorker courtesy Jasprit Bumrah 🔥🔥
Netherlands 5⃣ down now.
Follow the match ▶️ https://t.co/efDilI0dah#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/ywhQuctjOl
— BCCI (@BCCI) November 12, 2023
72 धावांवर नेदरलँडची तिसरी विकेट पडली. रवींद्र जडेजाने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने ओडॉडला क्लीनबोल्ड केलं. त्याने 42 चेंडूत 30 धावा केल्या. 66 धावांवर नेदरलँडची दुसरी विकेट पडली. अकरमन 32 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. पाच धावांच्या स्कोअरवर नेदरलँडची पहिली विकेट पडली. मोहम्मद सिराजने बरेसीला बाद केले. लोकेश राहुलने त्याचा झेल घेतला. बरेसीने पाच चेंडूंत चार धावा केल्या.
तत्पूर्वी, रोहित, गिल आणि कोहली यांच्या अर्धशतकी खेळीनंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या झंझावती शतकाच्या जोरावर भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून 50 षटकात 410 धावा केल्या. विश्वचषकातील भारताची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये बर्म्युडाविरुद्ध 413 धावा केल्या होत्या.
भारताकडून फलंदाजीत श्रेयस अय्यरने 94 चेंडूत 10 चौकार अन् 5 षटकारासह सर्वाधिक नाबाद 128 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकातील त्याचे हे पहिलेच शतक आहे. लोकेश राहुल 64 चेंडूत 102 धावा करून बाद झाला.त्याने शानदार खेळी केली आहे. या विश्वचषकातील हे पाचवे जलद शतक आहे. त्याचबरोबर भारतासाठी हे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले आहे. राहुलनं आपल्या खेळीत 11 चौकार अन् 4 षटकार लगावले.
कर्णधार रोहितने 61 आणि गिल-कोहलीने प्रत्येकी 51 धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुलने 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ते देशासाठी विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले.
नेदरलँड्सकडून गोलंदाजीत बस डी लीडे यानं सर्वाधिक दोन बळी घेतले. त्यानं रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना बाद केले. मीकरेन आणि मर्व यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.