पिंपरी – कामगारांच्या अंगावर स्टेनलेस स्टीलच्या प्लेट पडून तिघेजण जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी मोहननगर, चिंचवड येथील रिद्धी इंजिनिअरिंग कंपनीत घडली.
लक्ष्मण दत्तू जाधव (वय 45, रा. चिखली) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. राजू गणेश पाटकर (वय 23, रा. रामनगर, भोसरी) असे जखमीचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच हर्षल जितेंद्र चव्हाण हे देखील जखमी झाले आहेत. मुकेश बोहरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुकेश बोहरा याने कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना न केल्याने स्टेनलेस स्टीलच्या प्लेट अंगावर पडून तिघेजण जखमी झाले. त्यापैकी जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.