वर्क फॉर्म होम चालूच राहणार!

नवी दिल्ली- लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच कंपन्यांनी, ज्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करणे शक्‍य आहे अशा कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली होती. मात्र एकूण परिस्थिती पाहता आगामी सहा महिने तरी देशातील 70 टक्के कंपन्या याच पद्धतीने काम सुरू ठेवण्याची शक्‍यता आहे.

यासंदर्भात नाईट फ्रॅंक या संस्थेने जारी केलेल्या सर्वेक्षणावर आधारित अभ्यास अहवालात म्हटले आहे की, पुढील सहा महिने तरी 70 टक्के कंपन्या पूर्ण क्षमतेने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊ देणार नाहीत. त्यातील काही भाग घरातूनच करून घेण्याची शक्‍यता आहे. सेवा क्षेत्रातील आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बऱ्याच कंपन्यांना घरातून काम करता येऊ शकते.

त्यामुळे अशा कंपन्यांच्या उत्पादकतेवर फार मोठा परिणाम होत नाही. अशा अवस्थेत कर्मचाऱ्यांचे आरोग्य अबाधित राहावे आणि कंपन्यांच्या कामावरही परिणाम होऊ नये यासाठी या कंपन्या काही काळ वर्क फॉर्म होम संकल्पना राबविण्यात राबविणे चालू ठेवणार आहेत. 25 मार्चपासून देशभर लॉकडाऊन चालू आहे. सुरुवातीच्या काळात कंपन्यांची आणि कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. मात्र आता यासाठीचे आवश्‍यक तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अदे असले तरीही सर्वच कंपन्यांच्या सर्वच कर्मचाऱ्याना घरातून करता येणे शक्‍य नाही. त्यासाठी आवश्‍यक कर्मचारी कार्यालयात किंवा उत्पादन स्थळावर येतील. प्रशासकीय आणि इतर बाबी वर्क फॉर्म होम पद्धतीने चालू ठेवल्या जातील. मात्र मनुफॅक्‍चरिंगसारख्या क्षेत्रांना अशी सुविधा उपलब्ध होणे शक्‍य नाही. त्यासाठी मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात कामगारांना उपस्थित राहून काम करावे लागण्याची शक्‍यता आहे. तरीही यामुळे कार्यालयीन जागेची मागणी कमी करणार नाही. कारण काही कालावधीनंतर या कंपन्यांना पूर्ण क्षमतेने काम चालू ठेवावे लागणार आहे. सध्याच्या काळात कार्यालयातील मेंटेनन्स खर्च बऱ्यापैकी कमी होऊ शकतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×