इंदापुरातील महिला आमदार भरणेंच्या पाठीशी

रेडा – राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी कायमच मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे महिला आज स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत, त्यामुळे तालुक्‍यातील महिला राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भरणे यांच्या पाठीशी खंबीर उभ्या आहेत, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका महिला अध्यक्षा छाया पडसळकर यांनी दिली.

वडापुरी-काटी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील रेडा, रेडणी, पंधारवाडी, सराफवाडी पिटकेश्‍वर, वडापुरी वरकुटे या गावात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या वतीने गाव भेट दौरा करून मतदारांशी पडसळकर यांनी संवाद साधला. याप्रसंगी तेजश्री भरणे, फर्जना शेख, झगडेवाडीच्या सरपंच रूपाली झगडे, वडापुरी गावच्या सरपंच संगीता तरंगे, पिटकेश्‍वर गावच्या सरपंच सविता अभंग, अर्चना कांबळे, वरकुटे खुर्दच्या द्रोपदा शेंडे, कल्याणी धायतोंडे यांच्यासह शेकडो महिला या दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या.

छाया पडसळकर म्हणाल्या की, इंदापूर तालुक्‍यातील प्रत्येक गावात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून घवघवीत विकासकामांसाठी निधी मिळाला आहे. गेल्या 20 वर्षांपासून उपेक्षित राहिलेली कामे मार्गी लागली आहेत. आगामी काळात विकासाची गंगा कायम ठेवण्यासाठी आमदार भरणे यांना अधिकचे मताधिक्‍य देऊन निवडून द्या. तालुक्‍यातील दलित वस्तीमध्ये मागासवर्गीय वस्तीतील विकासासाठी आमदार भरणे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यामुळे आज विकास दिसतो आहे.तालुक्‍यातील महत्त्वाचे व दळणवळणासाठी नितांत गरजेचे रस्ते अद्यावत निर्माण झाले आहेत. जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार भरणे यांनी कष्ट घेतले असल्यामुळे मोठा जनाधार लाभतो आहे, असे त्यांनी नमूद केले.

महिला आघाडीची प्रचारात आघाडी
इंदापूर तालुक्‍यात पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य वैशाली पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा छाया पडसळकर, पंचायत समितीच्या सदस्या सारिका लोंढे, शीतल वनवे, शैलजा फरतडे, गोतंडी गावच्या सरपंच शोभना कांबळे यांनी इंदापूर तालुका ढवळून काढला असून सध्या महिला आघाडीची प्रचारात मोठी आघाडी घेतली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.