सवाई माधोपूर – राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर असलेल्या पाली नावाच्या पुलावर एका नवरीने सासरी जाताना चंबळ नदीत उडी मारली. तिचा शोध सुरू आहे. नवरीच्या माहेरचे आणि सासरचे लोक घटनास्थळी पोहचले. सर्वजण नवरी सापडण्याची वाट पाहत नदी किनारी बसले आहेत.
पोलिसांनी याबाबत सांगितले की, अल्लापूर गावात हा विवाह झाला होता. मध्यप्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातून वरात आली होती. सर्व विधी होऊन विवाह पूर्ण झाला. सासरी जात असताना चंबळनदीवरील पाली या पुलावर गाडी आली असता नवरीने उलटी होत असल्याचे सांगून चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र, चालकाने खिडकी उघडण्यास सांगितले. मात्र, नवरीने जबरदस्तीने गाडी थांबवली. गाडीतून उतरून तिने सरळ पुलाखाली नदीत उडी मारली. नवरीला पोहता येत नसल्यामुळे ती नदीत बुडून वाहून गेली.