नवी दिल्ली – विप्रो या सॉफ्टवेअर कंपनीचा नफा समाधानकारक न राहिल्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या भावात गुरुवारी सहा टक्के घट झाली. त्यामुळे कंपनीचे बाजार मुल्य 22,712 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 2,969 कोटी रुपयांचा नफा झाला.
दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरच्या भावात गुरुवारी एक टक्का वाढ झाली. या कंपनीच्या नफा 12 टक्क्यांनी वाढून 9,769 कोटी रुपये झशला आहे.
नफा वाढल्यामुळे इन्फासीस कंपनीच्या शेअरच्या भावातही आज 1 टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून आले. इतर स्वॉफ्टवेअर कंपन्या लवकरचर ताळेबंद जाहीर करण्याची शक्यता आहे.