कोपरगाव, (प्रतिनिधी): संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विप्रो परी (प्रिसिजन ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंडिया प्रा. लि.) या जगभरातील मोठ्या ऑटोमेशन कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेऊन मेकॅनिकल व मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागातील १३ नवोदित अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकालाअगोरच नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. यातील सर्वच अभियंत्ये ग्रामीण भागातील असून, अशा प्रकारे शेकडो ग्रामीण युवक-युवती कुटूंबाचा आधार बनत आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी विप्रो परीने निवड केलेल्या सर्व नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डाॅ. राजेंद्र कापगते, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डाॅ. प्रसाद पटारे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. विशाल तिडके उपस्थित होते. विप्रो परीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रतिक हांडे, यश साळवे, सुमित सानप, रितिका वेलगुडे, तृप्ती मलिक, अदित्य जैन, अजितकुमार डौले व नयन सानप यांची तर मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग विभागातील आदित्य बढे, साक्षी गिते, प्राची जाधव, ऋषिकेश काळे व नकुल निबे यांचा समावेश आहे.
मी कोपरगाव तालुक्यातील कासली या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी. आमच्या १२ विद्यार्थ्यांच्या टीमला आयआयटी, दिल्ली येथे रोबोकाॅन स्पर्धेसाठी माझ्या डिपार्टमेंटच्या प्रयत्नाने सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातून मला रोबोटीक्स, ऑटोमेशन आदी बाबींची आवड निर्माण झाली. विप्रो परी ही ऑटोमेशनचीच कंपनी असल्यामुळे कंपनीच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
संजीवनीमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतरही बाबींचे ज्ञान मिळत असल्यामुळे माझी सहज नोकरीसाठी निवड झाली. मी शेतकरी कुटूंबातील. आमच्या मागील अनेक पिढ्यांमध्ये एकही मुलगी नोकरी मिळण्याइतपत शिकू शकली नाही. परंतु, संजीवनीच्या प्रयत्नातून मला नोकरी मिळाली, याचे सर्व श्रेय मी माझ्या काॅलेजला देते.