नवी दिल्ली – संसदेच्या नवीन इमारतीचे काम अपूर्ण असल्यामुळे हिवाळी अधिवेशन जुन्या इमारतीत घ्यावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022चे हिवाळी अधिवेशन संसदेच्या नवीन इमारतीत भरविले जाईल, असे लक्ष्य निर्धारित केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीत भरवावे लागणार आहे.
हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण होवू शकणार नाही. परंतु, अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात नवीन इमारतीत होईल, अशी आशा सुध्दा सूत्राने व्यक्त केली आहे. बजट सेशनची सुरूवात राष्ट्रपतींचे अभिभाषणाने होत असते. हे अभिभाषण नवीन इमारतीत होईल.
सरकारने संसदेची नवीन इमारत हिवाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण करण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले होते. ही इमारत ऐतिहासीक स्वरूपाची इमारत आहे. इमारतीचे सिव्हिल वर्क जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र फिनिशिंग टच, इलेक्ट्रिकल आणि इतर अनेक कामे या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू राहू शकतात. इमारतीच्या बांधकामासोबतच फर्निचर, चटई, भिंतीवरील भित्तीचित्रे बनविण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये एक सामान्य केंद्रीय सचिवालय, पंतप्रधानांचे नवीन निवासस्थान आणि पंतप्रधान कार्यालय आणि नवीन उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह यासह अनेक गोष्टींची कल्पना आहे.
यावेळी नेमकी तारीख सांगणे कठीण आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन जुन्या इमारतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतरही संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे आणि खासदारांना सर्व मदत मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांना परिचित करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे 15-20 दिवस लागतील. यासाठी लोकसभा सचिवालय, राज्यसभा सचिवालय, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, आयटीडीसी आणि हाऊस किपिंग स्टाफसाठी मॉक ड्रिल आणि व्यायामाचे आयोजन केले जाईल.