पुणे – थंडी वाढल्याने फुलांचे उत्पादन घटले आहे. सध्या सुट्या फुलांना मागणी कमी आहे. मात्र, लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे शोभिवंत फुलांना मागणी आहे.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे सर्व फुलांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : 12-30, गुलछडी : 60-200, ऑस्टर : जुडी 12-20, सुट्टा 80-100, कापरी : 10-25, शेवंती 60-120, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 30-40, गुलछडी काडी : 30-140, डच गुलाब (20 नग) : 150- 280 जर्बेरा : 100-140. कार्नेशियन : 300- 350