पंतप्रधान मोदींनी केले खासदारांना मार्गदर्शन
नवी दिल्ली : भाजपा खासदारांचा दोन दिवसीय अभ्यास वर्ग दिल्लीत रविवारी पाडला. यावेळी या अभ्यास वर्गात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन केलं. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरु करा. काहीतरी असं काम करा ज्यामुळे तुमच्या कामाच्या बळावर तुम्ही निवडून याल. मोदीच्या नावावर जिंकू असा विचार करु नका. तुम्हाला जिंकून देणं ही माझी जबाबदारी नाही. स्वत:चं काम असं करा ते लोकचं तुम्हाला निवडून देतील असं पंतप्रधानांनी सांगितले.
Sharing some glimpses from the second day of the ‘Sansad Karyashala’ where once again we had productive discussions.
Highlighted ways to strengthen our organisation and work for India’s progress with even greater vigour. pic.twitter.com/FCzcNZMa1f
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2019
कोणत्याही विजयात सर्वांचा वाटा असतो त्यामुळे मी स्वत:च्या जीवावर निवडून आलो आहे असं अभिर्भाव आणू नका. कार्यकर्ते आणि लोकांकडे दुर्लक्ष करु नका. काही बोलाल ते विचार करुन बोला. तुम्ही बोलण्यापासून ते वागण्यापर्यंत प्रत्येक गोष्टींवर लोकांचे लक्ष असते असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.