दरडी कोसळल्या, भरावही खचले
पुणे – मुंबईमधील संततधार पावसाचा सर्वात मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. पावसामुळे अनेक रेल्वे रुळांवर पाणी आले आहे. तर काही ठिकाणी रुळाखालील भराव खचणे आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाने गाड्या रद्द केल्या आहेत. तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
दि. 3, 4 रोजी रेल्वेने मुंबई ते पुणे, भुसावळ-सीएसएमटी-भुसावळ, सीएसएमटी- मनमाड, पंढरपूर पॅसेंजरसह मुंबई ते सुरत, सीएसएमटी ते चेन्नई आदी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर दि. 5 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकातून सुटणार आहे.
आजच्या रद्द रेल्वेगाड्या
पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
पुणे-मुंबई सिंहगड एक्स.
मुंबई-पुणे इंटरसिटी.
मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स.
सीएसएमटी-कोल्हापूर
सीएसएमटी-भुसावळ-सीएसएमटी एक्स्प्रेस
मनमाड-सीएसएमटी-मनमाड एक्स्प्रेस