मुंबई – अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलियासह रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर आता आलियाने अभिनेत्री करीना कपूरसोबतचे काही फोटो शेअर करत ‘कोणी आम्हाला काम देइल का ?’ अशी पोस्ट शेअर केली आहे. सध्या अलियाची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
करीना कपूर ही आलियाची ननंद आहे. या दोघांनी अद्याप एकत्र चित्रपटात काम केलेले नाही. यावरून आलियाने इनस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना आलियाने लिहिले की, “कोणी आम्हाला सोबत काम देईल का, म्हणजे आम्हाला गप्पा मारता येतील.” आलिया भट्टने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होत आहे. मात्र अनेकांनी तिच्या या पोस्टवर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींना दोघींना एकत्र चित्रपटात पाहण्यास उत्सुक असल्याचे म्हंटले आहे.
करण जोहरने देखील कमेंट करत लिहिले की, “आम्हाला या कलाकारांसह एक चित्रपट हवा आहे.” त्यामुळे आलिया आणि करीना एकत्र चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. करण जोहरने करीना आणि आलिया दोघींसोबत वेगवेगळ्या चित्रपटात काम केले आहे. करणने करीनासोबत ‘कभी खुशी कभी गम’ हा सिनेमा बनवला, तर आलियासोबत ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट केला. त्यानंतर करणाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्येही आलियाने पुन्हा अभिनय केला.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, करिना शेवटची आमिर खानसोबत ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये दिसली होती. ती तब्बू, क्रिती सेनन आणि दिलजीत यांच्यासोबत ‘द क्रू’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर आलिया शेवटची नेटफ्लिक्सच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये दिसली होती. याशिवाय ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये ती प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे.