नवी दिल्ली – भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला असून आपल्या मतदारसंघातील पीक खरेदीत कोणत्याही प्रकारची अनियमितता चालणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कृषी कायदा आणि यूपी सरकारवर सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे त्यांना पक्षाच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
जर शेतकऱ्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार झाला तर सरकारसमोर झुकणार नाही, तर थेट कोर्टात जाणार असा इशारा त्यांनी यातून दिला आहे.
जोपर्यंत एमएसपीची हमी मिळत नाही तोपर्यंत बाजार समित्यात शेतकऱ्यांचे शोषण होतच राहील. त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.