बॉलीवूडचा ऍक्शन मास्टर आणि सुपरस्टार अक्षयकुमार सोबत रूपेरी पडद्यावर झळकण्याची अनेक अभिनेत्रींची इच्छा असतेचीही ती होती. आता लवकरच मृणालची इच्छा पूर्ण होणार आहे. अक्कीने गतवर्षी “बेल बॉटम’ या आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती.
या चित्रपटामध्ये मृणाल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात अक्षयकुमार एका जासूसच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या चित्रपटात मृणाल अक्षयची नायिका असणार असल्याचे समजते. अद्याप तिच्याशी बोलणी सुरू आहेत. पण मृणालकडून सहमती दर्शवली गेली आहे. “घोस्ट सिरीज की एक कहानी’मधून मृणाल अलीकडेच प्रेक्षकांसमोर आली होती..
करण जोहरने याचे दिग्दर्शन केले होते. गतवर्षी “सुपर 30′ आणि “बाटला हाऊस’ या बहुचर्चित चित्रपटांमध्ये मृणाल मुख्य नायिका म्हणून दिसली. या दोन्हीही चित्रपटांनी तिकिट खिडकीवर चांगला गल्ला जमवला आहे. आता अक्षय आणि मृणालची जोडी “बेल बॉटम’मधून रसिकांना आकर्षित करण्यात किती यशस्वी होते हे पाहायचे.