अमरेली – गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील सिंहांच्या अभयारण्याजवळील गवताळ प्रदेशात काल आग लागली, परंतु सिंह आणि इतर वन्यजीवांवर परिणाम होण्याआधीच ही आग नियंत्रणात आणण्यात आली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी भडकलेली ही आग वन कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास आटोक्यात आणली आहे.
आतापर्यंत या आगीत कोणत्याही प्राण्याची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही आणि पुढील तीन दिवस परिसराचे स्कॅनिंग केले जाणार आहे. सिंहांसाठी संरक्षित क्षेत्र असलेल्या मितियाला वन्यजीव अभयारण्याजवळील एका टेकडीवरील झुडुपे आणि उंच गवतामध्ये ही आग लागली आणि ती 250 एकरमध्ये पसरली.काही पट्टे अजूनही जळत आहेत ती आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रकार त्या ठिकाणी या आधीही घडले आहेत.