मुंबई – बॉलिवूडमध्ये सध्या नवीन वर्षाची लगबग पाहायला मिळते. तरुण ज्युनिअर बॉलिवूड स्टार्स सध्या बॉलिवूड पार्टीजमध्ये दिसत आहेत. तर अनेक बॉलीवूड कपल नवीन वर्षानिमित्त व्हेकेशन वर गेल्याचे पाहायला मिळते. कतरिना कैफ आणि विकी कौशल ही जोडी देखील सध्या वेकेशन टूरवर आहे. स्वतः कतरिनाने आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.
विकी-कतरिना ही जोडी बोलीववूडमध्ये खूप फेमस आहे. दोघांनीही एकसे बढकर एक असे सुपर हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या दोघांबाबतचे अपडेट चाहत्यांना प्रचंड आवडतात. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दोघेही निवांत एकमेकांसोबत वेळ घालवताना देखील दिसत आहेत. सो मॅजिकल.. हे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे असं म्हणत कतरिनाने विकी सोबतचे जंगलातील काही फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
या फोटोवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. बेस्ट टाइम असं एका युजरने म्हंटल आहे तर दुसऱ्याने कतरिनाला हे लोकेशन नेमकं कोणतं आहे ? असा सवाल विचारला आहे. कतरिना लवकरच साऊथ स्टार विजय सेतुपतीसह मेरी ख्रिसमस या चित्रपटामध्ये दिसणार आहे.