हिंगोली – दिवाळीच्या दिवसात हिंगोली जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पत्नीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी पतीने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडली आहे. काजल सोनू उर्फ भीमराव घोगरे वय 20 असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव असून सोनू उर्फ भीमराव रामा घोगरे वय 22 असे पतीचे नाव आहे.
दिवाळीनिमीत्त काजलने माहेरी जाण्यास हट्ट धरला मात्र माहेरी जाण्यासाठी सोनूने विरोध केला. काजलला पतीचा विरोध सहन न झाल्यामुळे तिने घरातील छताला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेचा पती सोनूवर खूपच परिणाम झाला यातून दुसऱ्या दिवशी त्यानेही शेतात आत्महत्या केली. काजल आणि सोनू चे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते.