कसोटी क्रमवारीत पंतची झेप

दुबई – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने झेप घेतली आहे. तो आता 13 व्या स्थानावर आला आहे. विराट कोहली, रवींद्र जडेजा व अजिंक्‍य रहाणे यांची क्रमवारीत घरसण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लेबुशेन व इंग्लंडचा जो रूट यांनी क्रमवारीत प्रगती केली आहे.

सिडनी कसोटीपूर्वी पंत कसोटी क्रमवारीत 45 व्या स्थानावर होता. तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 36 व दुसऱ्या डावात 97 धावांची खेळी केली होती. तिसऱ्या कसोटीनंतर 26 व्या क्रमांकावर पंत पोहोचला होता. त्यानंतर निर्णायक चौथ्या कसोटी सामन्यात 89 धावांची खेळी केल्यामुळे पंत आता 13 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंतचीही आतापर्यंतची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे.

भारताच्या फलंदाजांबाबत बोलायचे झाले तर अजिंक्‍य रहाणे व विराट कोहली यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. कोहली तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर तर, रहाणे सातव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर गेला आहे. चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती झाली असून तो आता सातव्या स्थानावर आला आहे. शुभमन गिल 47 व्या क्रमांकावर आहे.

या क्रमवारीत पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन असून दुसऱ्या स्थानावर स्टिव्ह स्मिथ आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आहे. इंग्लंडच्या जो रूटने पाचवे स्थान मिळवले आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व रवीचंद्रन अश्विन यांनी एका स्थानाने प्रगती झाली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा तिसऱ्या तर, अश्विन सहाव्या क्रमांकावर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.