आणखी 60 उद्याने अनलॉक; लहान मुले, ज्येष्ठांना बंदीच

दि.25 जानेवारीपासून उद्याने सुरू होणार

पुणे- महापालिका प्रशासनाने शहरातील आणखी 60उद्याने सुरू करण्यास मान्यता दिली आहे. दि.25 जानेवारीपासून ही उद्याने सुरू होणार आहेत. आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश बुधवारी काढले.
यापूर्वी 29 ऑक्‍टोबर रोजी 81 उद्याने सुरू करण्यास मुभा देण्यात आली होती.

दरम्यान, उद्यानांमध्ये 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 10 वर्षांच्या आतील लहान मुलांना बंदी कायम असून व्यायाम तसेच चालण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, शहरातील महापालिकेच्या उद्यानांची दुरवस्था झाली असल्याने या प्रकरणी प्रशासनाने तातडीनं निर्णय घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यानंतर महापौरांनी उद्याने सुरू करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते.

शहरात महापालिकेची सुमारे 200 उद्याने आहेत. त्यातील सुमारे 141 उद्याने आयुक्तांच्या या आदेशानंतर तब्बल 9 महिन्यानंतर पुणेकरांसाठी खुली होणार आहेत. शहरात ऑक्‍टोबर 2020 च्या दुसऱ्या आठवड्यापासून करोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या लाटेचा अंदाज केंद्राने वर्तविला होता.

मात्र, जानेवारीचे तीन आठवडे गेल्यानंतरही शहरातील रूग्णसंख्येचा आलेख घटलेला आहे. त्यामुळे, महापालिकेकडून शहरातील लॉकडाऊन शिथील करण्यास प्राधान्य दिले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून आता महापालिकेने आणखी 60 उद्याने पुणेकरांसाठी खुली केली आहेत. मात्र. त्याच वेळी, उद्यानांमध्ये सामाजिक आंतर पाळणे, उद्यानात सामूहिक कार्यक्रमांना बंदी, मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.