चंद्रावर होणार वाय-फाय नेटवर्क; नासाच्या योजनेमुळे अवकाश मोहिमेतील अडसर होणार दूर

वॉशिंग्टन – पृथ्वीवरवास्तव्य करणाऱ्या सर्वच लोकांना वायफाय हे शब्द परिचित असले तरी आता पृथ्वीचा महत्त्वाचा उपग्रह असलेल्या चंद्रावरही वायफाय नेटवर्क उभारण्याच्या दिशेने हालचाली नासाने सुरू केल्या आहेत. नासाच्या शास्त्रज्ञांनी याबाबत नियोजन केले असल्याने आगामी कालावधीमध्ये अवकाश मोहीममध्ये येणारा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अडसर दूर होण्याची शक्यता आहे.

नासाच्या ग्लेन रिसर्च सेंटर मधील शास्त्रज्ञ मेरी लोबो यांनी याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे चंद्रावर उभारण्यात आलेल्या वायफाय नेटवर्कचा फायदा पृथ्वीवर ही काही प्रमाणात होईल असेही त्यांनी म्हटले आहे. चंद्रावर पुन्हा एकदा माणसाला पाठवण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याने त्या पार्श्वभूमीवर हे नियोजन अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे.

नासाने चंद्रावर पुन्हा एकदा माणसाला पाठवण्याबाबत आपल्या योजनेची घोषणा केली होती 2021 मध्ये सर्वात प्रथम चंद्रावर मानव विरहित यान पाठवण्यात येणार असून त्यानंतर 2024 मध्ये माणसांना घेऊन जाणारे यानही चंद्रावर उतरणार आहे.

जेव्हा हे मानवांना घेऊन जाणारे चंद्रयान चंद्रावर उतरेल तेव्हा अंतराळवीरांना पृथ्वीशी कनेक्टिव्हिटी साधण्यासाठी या वाय-फाय नेटवर्कचा अतिशय फायदा होणार असल्याचे नासा तर्फे सांगण्यात आले आहे. नजीकच्या काळात या मोहिमेबाबत अधिक तपशील जाहीर केले जाणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.