सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते? – राहुल गांधी

कोलार (कर्नाटक) – बहुतेक चोरांचे नाव मोदीच का असते असा उपरोधिक सवाल कॉंग्रेस अध्यक्ष राहुूल गांधी यांनी केला आहे. आज येथील एका जाहींरसभेत बोलताना ते म्हणाले की मला हा प्रश्‍न नेहमी पडतो. मग ते नीरव मोदी असोत, ललित मोदी असोत किंवा नरेंद्र मोदी असोत. असे आणखी किती मोदी उघडेपडणार आहेत याची कल्पना नाही. शंभर टक्के चौकीदारच चोर आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले.

राफेल प्रकरणाचा पुन्हा उेल्लख करून ते म्हणाले की मोदींनी तुमच्या खिशातले 30 हजार कोटी रूपये चोरून ते त्यांच्या अनिल अंबानी नावाच्या चोर मित्राला दिले आहेत. मोदींनी मेहुल चोकसी, ललित मोदी, विजय मल्ल्या अशी सगळी चोरांची टोळी बनवली आहे असेही ते म्हणाले. मोदी आज जाहींर सभांमधून शेतकऱ्यांचे प्रश्‍न, रोजगार, भ्रष्टाचार अशा विषयांवर काहीही बोलत नाहीत. आम्ही त्यांच्या सारखे खोटे बोलत नाही. आम्ही गरीब कुटुंबांसाठी वर्षाला 72 हजार रूपये देण्याची क्रांतीकारी न्याय योजना आणली आहे. त्याचा देशातील पाच कोटी गरीब कुटुंबाना लाभ होणार आहे. कॉंग्रेस सत्तेवर आल्यास महिलांना सर्व क्षेत्रात 33 टक्के आरक्षण देण्याची ग्वाहींहीं त्यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.