आयएल ऍन्ड एफएस कंपनीचे माजी प्रमुख रमेश बावा यांना अटक

नवी दिल्ली – पायाभूत क्षेत्राला अर्थपुरवठा करणाऱ्या आयएल ऍन्ड एफएस कंपनीचे माजी प्रमुख रमेश बावा यांना आज अटक करण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात त्यांच्या अटकेला मनाई करण्यास कोर्टाने नकार दिल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीचे जवळपास 91 हजार कोटी रूपयांचे कर्ज बुडाले आहे. बावा यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यातच या कंपनीच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. या कंपनीतील घोटाळ्याबद्दल कंपनीचे माजी अध्यक्ष हरी शंकरन यांना या आधीच अटक करण्यात आली आहे.

या कंपनीच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे म्युचुअल फंड योजना चालवणाऱ्या अनेक कंपन्या अडचणीत आल्या असून त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांपुढे अनिश्‍चतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयएल ऍन्ड एफएस कंपनी 91 हजार कोटी रूपये इतक्‍या मोठ्या रकमेला बुडाली असल्याने सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली आहे. त्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून या कंपनीच्या कारभाराची चौकशी सरकारने सुरू केली. त्यानंतर कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गैरव्यवहारांच्या प्रकरणात गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच प्रक्रियेत रमेश बावा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.