भारताने केलेली प्रगती न पहावल्याने कॉंग्रेस व मित्र पक्ष आपल्याला घालवण्याच्या प्रयत्नात – मोदी

थेनी (तामिळनाडू) – भारताने गेल्या काही वर्षात जी मोठी प्रगती केली आहे ती न पहावल्यानेच कॉंग्रेस व त्याच्या मित्र पक्षांच्या महाभेसळ आघाडीने आपल्याला सत्तेवरून घालवण्याचा प्रयत्न चालवला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. द्रमुक आणि कॉंग्रेस आघाडीच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की हे दोन्ही पक्ष एकमेकांचे शत्रु आहेत पण त्यांनी अपरिहार्यतेतून एकमेकांशी हातमिळवणी केली आहे.

द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची मागणी केली होती पण त्यांच्या आघाडीतील बाकीच्या पक्षांनी त्यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही. कारण त्यांच्या आघाडीत अनेक जण या पदावर डोळा ठेऊन उभे आहेत असे ते म्हणाले. द्रमुक आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष भ्रष्ट असून त्या भ्रष्टाचाऱ्यांनी मोदींच्या विरोधात महाआघाडी करून इमानदार नेतृत्वाला पराभूत करण्याचा प्रयत्न चालवला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.