मुंबई – आजकाल दुचाकी विकत घेताना प्रत्येकजण एबीएस सिस्टीम तपासून घेतो. ड्युअल-चॅनल एबीएस सिंगल-चॅनल एबीएस सिस्टीम सध्या अनेक दुचाकींमध्ये आहे. दुचाकींमध्ये या सिस्टीमचा उपयोग चांगल्या पद्धतीने केल्यास याचा चालकाच्या सेफ्टीवर मोठा परिणाम होत असल्याचे पाहायला मिळते.
ड्युअल-चॅनल एबीएस सिंगल-चॅनल एबीएस प्रमाणेच कार्य करते. तथापि, ड्युअल-चॅनल मॉडेलमध्ये, दोन स्वतंत्र ब्रेक चॅनेल असतात. जे एक समोर आणि एक मागील बाजूस असते. ज्यामुळे बाइकची ब्रेकिंग कार्यक्षमता वाढते. ही सिंगल-चॅनल ABS ची प्रगत आवृत्ती मानली जाते.
ड्युअल चॅनल एबीएसचे फायदे
सध्या मोटरसायकलमध्ये एबीएस स्टॅंडर्ड फिचर म्हणून येत आहे.चांगली सुरक्षा सेवा म्हणून त्याकडे पहिले जाऊ शकते.
एबीएसमुळे मोटारसायकलच्या सुरक्षेत झालेली सुधारणा नेहमी फायदेशीर ठरते. हे अचानक ब्रेकिंग करताना चाके लॉक होऊ नये म्हणून याचा उपयो होतो. ज्यामुळे रायडरला निसरड्या स्थितीत स्टीयरिंग नियंत्रित करण्यास मदत होते. त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होण्यास मदत होऊ शकते.
जर तुम्हाला थोड्या अंतरात ब्रेक मारायचा असेल तर ड्युअल चॅनल एबीएस तुम्हाला खूप मदत करते. यामुळे तुम्हाला तुमच्या बाईकवर पूर्ण नियंत्रण मिळते.
एबीएस सिस्टीम मोठ्या प्रमाणात रेसिंग बाईक्स सारख्या दुचाकींना फार उपयोगी असल्याचे दिसून येते. अचानक पणे ब्रेकचा वापर करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी याची खूप मदत होताना दिसते. म्हणूनच लॉंग ड्राइव्ह किंवा बाईक ट्रिप करणारे रायडर ही प्रणाली आपल्या दुचाकीमध्ये आवर्जून तपासून घेतात.