मुंबई -ऑस्ट्रेलियाच्या संघात पाच डावखुरे फलंदाज आहेत हे माहिती असूनही संघात रविचंद्रन अश्विनची निवड का केली गेली नाही, असा सवाल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कर्णधार रोहित शर्मा व राहुल द्रविड यांना केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघ पराभूत झाला त्यामागे जी काही कारणे आहेत त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे अश्विनचे संघात नसणे हे आहे, असेही सचिन म्हणाला.
जे काम ऑस्ट्रेलियासाठी ऑफ स्पीन गोलंदाज नाथन लॉयनने केले, त्यापेक्षा जास्त सरस कामगिरी अश्विनने भारतीय संघासाठी केली असती, असेही सचिनने म्हटले आहे.