मुंबई – अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) खान नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्स, बोल्ड मेकअप आणि तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अनेकदा विविध ठिकाणी स्पॉट होते. आता पुन्हा एकदा करीना कॅमेऱ्यात कैद झाली असून यावेळी तिने परिधान केलेल्या कपडयांमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
करीना कपूर वांद्रे येथील एका स्टुडिओबाहेर दिसली. यावेळी तिने हिरव्या रंगाचा कॉटन गाऊन घातलेला दिसला. तर डोळ्यांवर काळा गॉगल घातला होता. पण जेव्हा तिचा हा लूक सोशल मीडियावर समोर आला तेव्हा लोकांनी तिच्या ड्रेससाठी करीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी करीना कपूरच्या पोशाखाचे वर्णन रुग्णालयातील रुग्णाचा ड्रेस असे केले आहे.3
View this post on Instagram
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘हॉस्पिटलच्या पेशंटसारखा दिसत आहे.’ दुसर्या व्यक्तीने लिहिले ‘तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.’ तिसऱ्या यूजरने कमेंट केली- ‘ती पेशंटचा ड्रेस घालून कुठे जात आहे?’ आणखी एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले ‘तु हॉस्पिटलचा गाऊन का घातला आहे?’
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, करीना कपूरने नुकतेच ‘जाने जान’ या सस्पेन्स क्राईम थ्रिलर चित्रपटाद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. जाने जान चित्रपटाचे डायरेक्टर सुजॉय घोष आहे. यापूर्वी त्यांनी कहाणी आणि बदला सारखे सस्पेंस चित्रपट दिले आहे. त्यानंतर आता करीना हंसल मेहताच्या ‘द बकिंघम मर्डर्स’मध्ये दिसणार आहे.