मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 4’ची विजेती ‘श्वेता तिवारी’ अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. श्वेता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत नवीन फोटोशूट्स करते आणि आपल्या बोल्ड लूक मुळे चाहत्यांना वेड लावते.
श्वेतानं यावेळी पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर अत्यंत मादक फोटो शेअर केले असून, तिचा हा ग्लॅमर्स अंदाज फॅन्सला अक्षरशः वेड लावणारा आहे. या फोटोमध्ये श्वेतान व्हाईट रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तिचा ड्रेस खूपच सुंदर आहे. मात्र यावेळी तिच्या फोटोशूट प्रमाणेच तिने या फोटो सह दिलेल्या कॅप्शनची ही चर्चा चांगलीच रंगली आहे.
श्वेताने लिहिले की,”वे- इतना क्यों हंस रही है… हम- तेरे बाप का क्या जाता है.” तिच्या या कॅप्शनची सध्या सोशलवर चांगलीच चर्चेत आली आहे. चाहते हसणारे आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
चाहते श्वेता तिवारीच्या किलर स्माईलचे आणि तिच्या जबरदस्त लुकचे कौतुक करत आहेत. श्वेता तिवारी ही अशीच एक अभिनेत्री आहे जी तिच्या कामामुळे चर्चेत असते. तसेच, श्वेता तिवारी तिच्या जबरदस्त लुकमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.