अभिनेत्री तापसी पन्नू सध्या बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार करणाऱ्या डंकीच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. दरम्यान, तापसी चाहत्यांना तिच्या नवीन वर्ष 2023 च्या सेलिब्रेशनची एक झलक दाखवली, ज्यामध्ये चाहत्यांना तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोईची झलक पाहायला मिळाली. मॅथियास बोई कोण आहे तो नेमका काय करतो अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने स्वतः सांगितले आहे की,’तिचे नवीन वर्ष केरळमध्ये साजरे केले. क्लिपसोबत तापसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, केरळ… आमचा आमच्या मागील आयुष्याशी काही संबंध आहे. या पोस्टवर चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तिच्या बॉयफ्रेंडची झलक पाहून चाहते खूश झाले आहेत.’
डिंकी 21 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता, ज्यामध्ये शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. तापसी पन्नू तिचे वैयक्तिक आयुष्य कधीच सार्वजनिक करत नाही. पण ती मॅथियाससोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होती. सध्या अभिनेत्रीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तापसीच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, तापसी पन्नूने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली, त्यानंतर तिने साऊथ सिनेमात हात आजमावला. तापसी टॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तापसीला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही, परंतु तिने ‘बेबी’ चित्रपटात छोटी भूमिका करून प्रसिद्धी मिळवली.