नवी दिल्ली: राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी बुधवारी उच्च सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांपैकी 45 जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कोविड -१९ साथीच्या आजारामुळे राज्यसभेच्या चेंबरमध्ये आंतर सत्रात शपथविधी पार पडला. यावेळी, ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह आमने-सामने आले. ज्यांनी अनेकदा एकमेकांवर शब्दांचे वार केले.
दोन्ही नेत्यांनी मास्क परिधान केले होते. जेव्हा दोन्ही नेते आमनेसामने आले तेव्हा दोघांनीही एकमेकांना हात जोडून अभिवादन केले. दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझादसुद्धा उपस्थित होते. ते सुद्धा हातवारे करताना दिसतात.
महत्त्वाचे म्हणजे शिंदे यांनी काँग्रेसला मोठा झटका देत. कॉंग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झाले. यानंतर शिंदे आणि दिग्विजय यांच्यात बरीच शाब्दिक युद्ध झाले. सिंधिया यांनी कमलनाथ सरकारविरोधात आवाज उठविला, तेव्हा कमलनाथ यांच्याबाजूने दिग्विजय सिंह मैदानात आले. असे म्हटले जाते, की सिंधियाच्या बंडखोरीमागील एक कारण म्हणजे राज्यसभा जागा होती ज्यावर दिग्विजय निवडले गेले होते.
४५ नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली
आज ४५ नवनिर्वाचित सदस्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. ३६ सदस्य पहिल्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुका / पोटनिवडणुकीत २० राज्यांमधून ६१ सदस्य निवडले गेले, त्यापैकी ४५ जणांनी आज शपथ घेतली.