‘किरकोळ’ कारणावरुन अल्पवयीन टोळक्‍याचे एकावर कोयत्याने वार

पुणे(प्रतिनिधी) – पबजी खेळताना हातातून पडून मोबाईल फुटल्याने,त्याची नुकसान भरपाईची मागणी एक अल्पवयीन टोळके मित्राकडे करत होते. मात्र मित्राने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने त्याला हाताने मारहाण करत त्याच्या काकावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना वडगावशेरी येथे साईनगर येथे घडली. याप्रकरणी तीन अल्पवयीन बालाकांविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अभिषेक सिंग(18,रा.वडगाव शेरी) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. दोन महिण्यापूर्वी यातील एकाचा मोबाईल फिर्यादीने पबजी गेम खेळण्यासाठी घेतला होता. हा मोबाईल हातातून पडल्याने नूकसान झाले होते. याची नूकसान भरपाई म्हणून तीन हजार रुपयांची मागणी आरोपी मुले फिर्यादीकडे करत होती. फिर्यादी मागील दोन महिण्यापासून त्यांना नूकसान भरपाई देतो असे सांगत होता.

दरम्यान, घटनेच्या दिवशी आरोपी फिर्यादीच्या घराजवळ आले. यानंतर पुन्हा पैशाची मागणी करत त्यांच्यात वाद झाला. यांनर आरोपी मुले फिर्यादीला मारहाण करु लागले. ही भांडणे फिर्यादीचा चुलता रुदलसिंग याने मध्ये पडून सोडवली. यावेळी आरोपी मुले तेथून निघून गेली. मात्र थोड्या वेळानंतर पुन्हा ते कोयता घेऊन आले. यानंतर चुलत्याच्या हातावर कोयत्याने वार करुन हाताने मारहाण केली. याप्रकरणाचा पोलिस उप निरीक्षक व्हि.एस.सिसाळ करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.