बराच काळ झोपून असल्यास (बेड रेस्ट असल्यास) आणि अचानक उठून बसल्यास
गरोदरपणात साधारण पहिल्या आठवड्यामध्ये खूप रक्तस्राव झाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास उच्च रक्तदाबासाठी उपचार सुरू असताना, हृदयासंबंधी, नैराश्यासंबंधी काही औषधे सुरू असताना, पार्किन्सन आजाराची औषधे घेत असताना हृदयविकारांमध्ये, हृदयाच्या झडपांमध्ये बिघाड झाल्यास, हृदयविकाराचा झटका आल्यास अंतःस्त्रावी ग्रंथींच्या आजारात उदा – हायपोथायरॉईडिसम, पॅराथायरॉईडचे आजार, ऍडिसन डिसीज, मधुमेह आणि रक्तशर्करा कमी होणे तीव्र ऍलर्जी
मज्जासंस्थेचे विकार
आहारात जीवनसत्व ब-12, फोलिक ऍसिड यांचा अभाव असणे
रक्तदाब कमी होणे हे आपल्या कल्पनेपेक्षा अधिक प्रमाणात सर्वसामान्यपणे दिसून येते. बहुतांशी हे गंभीर नसले आणि काही लक्षणे नसली तरी रक्तदाब नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे.
कमी रक्तदाबासाठी काय उपचार आहेत?
हे सर्वस्वी त्यामागच्या करणावर अवलंबून आहे, पण तातडीने करता येण्याजोग्या काही गोष्टी आहेत-
पाय हृदयाच्या पातळीच्या वर येतील असे (पायाखाली उशी ठेवून) झोपणे
द्रवपदार्थांचे सेवन करणे
बराच काळ उभे रहाणे टाळणे
बऱ्याच व्यक्तींमध्ये दीर्घकालीन कमी रक्तदाब जीवनशैलीत काही बदल करून सुधारता येतो.
कायम लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे, कमी रक्तदाब हा जास्तीच्या रक्तदाबापेक्षाही धोकादायक असतो. कमी रक्तदाब ही सर्वात धोकादायक गोष्ट असते, हे ध्यानात ठेवावे.