अभिनेत्री अनुष्का शर्माने सध्या आपल्या कुटुंबासोबत मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्ट्या एन्जॉय करत मस्त वेळ घालवत आहे. दरम्यान बीच वर अनुष्काने स्वतःच फोटोशूट स्वतःच केल्याचं दिसून आलं. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर म्हणजेच इंस्टाग्रामवर त्याच फोटोशूट मधील काही फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या त्या फोटोजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
View this post on Instagram
फोटोंमध्ये अनुष्का केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिचे चाहते त्या फोटोंचं भरभरून कौतुक करत आहेत. तिने शेअर केलेल्या या पोस्टला अवघ्या ५ तासांमध्येच 15 लाखांहून अधिक लाईक्स आले मिळाले.
View this post on Instagram
नो मेकअप लूक ची चर्चा
अनुष्का तिच्या नो मेकअप लूक साठी देखील नेहमी चर्चेत असते. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये देखील तिने चेहऱ्यावर कोणताही मेकअप लावल्याचं दिसत नाही. आणि तरी देखील तिच्या सौंदर्यात कोणतीही कमी पडलेली नाही. शिवाय ती आता एका मुलीची आई देखील आहे. आई झाल्यानंतरही तिने स्वतःचा फिटनेस ज्या पद्धतीने जपलेला आहे त्याचंही तिच्या चाहत्यांना खूप जास्त कौतुक आहे. लग्न, प्रेग्नन्सी याचा तिच्या करिअरवरती त्यासोबतच तिच्या चाहत्या वर्गावर कोणताही परिणाम झालेला नाही. दिवसेंदिवस तिचा चाहता वर्ग वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.