नवी दिल्ली – देशभरात करोना स्फोट होताना दिसत आहे. करोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १.३१ लाख नवीन करोना रुग्णांची भर पडली. तर ८०० जणांचा मृत्यू झाला. देशात करोना आल्यापासून आतापर्यंतची ही सर्वात मोठा वाढ असल्याचे म्हटले जात आहे.
CHEERS: A 104-year-old woman gets a round of applause from hospital staff as she heads home after beating COVID-19 for a second time. https://t.co/EJ7heg2fcP pic.twitter.com/qJx0kKUB7z
— ABC News (@ABC) April 8, 2021
यातच, सोशल मीडियावर कोरोनाबाबत एक सकारात्मक घटना व्हायरल होत आहे. कोलंबिया येथील १०४ वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. १०४ वर्षीय आजींचे नाव कॅरमन हेरनानडींज असून त्यांना हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवत शुभेच्छा देत डिस्चार्ज देण्यात आला. सध्या हा फोटो सकारात्मक विचारांसोबत युजर्सद्वारे सोशलवर व्हायरल होत आहे.
दरम्यान, या आजीन जवळपास २ वेळी कोरोनाला हरवलं आहे. एकदा कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर आजी पूर्णपणे बऱ्या झाल्या. त्यानंतर पुन्हा त्यांना व्हायरसचं संक्रमण झालं होतं. १०४ वर्षाच्या आजीबाईंना या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफने अत्यंत भक्तीभावे सेवा दिली असून आता त्यांची तब्येत स्थिर आहे.