काय आहे 50 व्या इफ्फीमध्ये…?

पणजी : सुवर्ण महोत्सवी इफ्फी  मध्ये उपस्थितांना जगातल्या 76 देशांमधले 200 सर्वोत्तम चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच 35 मास्टर क्लासेसमधून चित्रपट निर्मितीचे विविध कंगोरे समजून घेता येणार आहेत. या महोत्सवात रशियातील 8 चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

या महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी या वर्षीच्या कार्यक्रमांमध्ये 2 विशेष विभागांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सुवर्ण मयूर विजेत्या चित्रपटांचे सिंहावलोकन करणाऱ्या विभागाचा समावेश आहे. या विभागात यापूर्वी सुवर्ण मयूर पुरस्काराने सन्मानित चित्रपटांचा तसेच 2019 मध्ये ज्या भारतीय चित्रपटांना 50 वर्ष पूर्ण होत आहेत अशा आणि सध्या चित्रपटांच्या ‘गोल्डन लाईनिंग’ विभागाचा समावेश आहे.

इफ्फी मध्ये पदार्पण करणाऱ्या 90 आंतरराष्ट्रीय चित्रपटांव्यतिरिक्त या महोत्सवात ‘गोल्डन स्टोरी’ अंतर्गत प्रादेशिक चित्रपटांना अधोरेखित करणारे कोकणी चित्रपट दर्शवण्यात येणार आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेले 97 माहितीपट आणि लघुपट दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या कॅलिडोस्कोपमध्ये विविध चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते चित्रपट दाखवण्यात येतील. यामध्ये ‘अ सन’, ‘अँड देन वी डान्सड्’ ‘बकुराउ’ आणि ‘एको’ या चित्रपटांचा समावेश आहे. या वर्षीच्या महोत्सवात अनेक गोष्टी प्रथमच घडत असून, महिला चित्रपट निर्मातींकारांवर विशेष लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. या विभागात जगभरातील 50 चित्रपट दाखवण्यात येणारे आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)