मुंबई – दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. याशिवाय या चित्रपटातील ‘तू क्या मिले’ हे गाणंही प्रदर्शित करण्यात करण्यात आलं होत.
दरम्यान, अश्यातच या चित्रपटातील आणखी एक गाणं सिनेरसिकांच्या भेटीला आलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, प्रेक्षकांचा देखील गाण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘वट्ट झुमका..’ हे गाणं रिलीज झाले आहे. गाण्यात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग दिसत आहेत.
हे गाणे प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने गायले आहे. या गाण्यात आयकॉनिक झुमका गिरा रे गाण्याची धून आणि काही शब्द वापरण्यात आले आहेत. धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत इंस्टाग्राम आकाउंटवरून हे गाणं शेअर करण्यात आलं आहे.
दरम्यान, हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. कॉमेडी आणि रोमान्सचा तडकाही या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.