अर्जेंटिना – घरामध्ये आपण साफसफाई करतांना नेहमीच काही ना काही हरवलेले आपल्या सापडत असते. मात्र यावेळी एक व्यक्तीला घराची साफ सफाई करतांना घरातील वस्तू न सापडत घराच्या बागेत एका बाटलीत चक्क पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट सापडला. ज्यामुळे त्याला धक्का बसला आहे.
याबाबत सविस्त वृत्त असे की, अर्जेंटिनाच्या बॅकर्समध्ये येथे राहणारी व्यक्ती बागेत साफसफाई करत होती. बागेतील गवताच्या जागी साफसफाई करतांना तिला दुर्गंध येऊ लागला. या दुर्गंधामुळे त्याने आजूबाजूला उंदीर मेला असावा असे गृहीत धरून पुन्हा बागेची साफसफाई करायली घेतली. मात्र साफसफाई करतांनाच पुढे त्याला बागेत एक बाटली सापडली. या बाटलीतूनच दुर्गंध येत होता. या बाटलीत चक्क पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट होता. कापलेली पेनिस या बाटलीत होती. या व्यक्तीला या घटनेमुळे धक्काच बसला, त्याने लगेच याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी आता फॉरेन्सिक तपासणी सुरू केला आहे.
पोलिसांनी स्थानिक या घटनेचा तपस सुरु केला आहे. स्थानिक लोकांनी याबाबत असे सांगितले आहे की, हा काळ्या जादूचा प्रकार असावा. दरम्यान पोलीस या परिसरातील रुग्णालयातही चौकशी करत आहे. तिथं एखादी व्यक्ती प्रायव्हेट पार्टच्या उपचारासाठी आली असावी आणि तिचा हा प्रायव्हेट पार्ट असावा, असा संशय त्यांना आहे.