Madhya Pradesh Election Result 2023 – लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निकालांकडे पाहिलं जात होत. आज चार राज्यांचे निकाल लागले. यानुसार छत्तीसगढ,मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये (Chhatisgadh MP Rajsthan Election Result) भाजपचा मुख्यमंत्री होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. तर तेलंगणामध्ये बीआरएसचं (BRS Sarkar) सरकार जाऊन काँग्रेसची सत्ता आली आहे. आज लागलेल्या चार राज्यांच्या निकालामध्ये तीन राज्यांमध्ये भाजप तर एका राज्यामध्ये काँग्रेस विजयी झालं आहे. मध्य प्रदेशात भाजप जिंकला असला तरी मराठी मतदार काहीसा नाराज आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया भाजपच्या (bjp) ज्येष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांनी दिली आहे.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, इंदौरमध्ये नऊ पैकी नऊ जागांवर भाजपला आघाडी मिळवण्यात यश आले आहे. आतापर्यंतच हाती आलेल्या निकालामधून हे स्पष्ट होत आहे. परंतू या भागातील मराठी मतदार काहीसे नाराज आहेत. त्यांना मराठी उमेदवारांची अपेक्षा होती. ही नाराजगी संपूर्ण मध्य प्रदेशमधील मराठी मतदाता आणि मराठी कार्यकर्त्यांमध्ये आहे. (Sumitra Mahajan on madhya pradesh election result)
मग ते मराठी मतदार असोत की, मराठी नेते असोत. ही वस्तुस्थिती आहे. त्याला कुणी नाकारू नाही शकत नाही. मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीपासूनच मराठी नेतृत्व चांगले राहीले आहे. मी येथे येण्या आधीसुद्धा जबलपूरमध्ये बाबुराव परांजपे हे दमदार मराठी नेते होते. ग्वाल्हेरला शेजवलकर, भाऊसाहेब पोतनीस इंदौलकर ही नेते मंडळी होती. तेव्हा ही मराठी नेते मंडळी प्रबळ होती. परंतू आता थोडी नाराजी आहे. परंतू आमचे मतदार कुठेही हालत नाहीत. ते आमच्याच बाजुने आहेत असे म्हणत त्यांनी मध्य प्रदेशमधील निकालावर बोट ठेवले.
फडणवीसांचा काँग्रेसला टोला
आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळलं असेल. निवडणूक निकालात ते दिसून आलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत याची मला खात्री आहे. “जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच हे यश आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवलं आहे की सरकार त्यांच्यासाठी काम करतं आहे. त्याचं प्रत्यंतर लोकांना पाहण्यास मिळालं हा त्याचा विजय आहे” असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटल आहे. (Bjp Vs congress)