Pre-Wedding Shoot : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मात्र, व्हिडीओ पाहिल्यानंतर कर्नाटक सरकारने तातडीने या प्रकरणावर कारवाई केली. हे प्रकरण कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
लग्नाआधीचे फोटोशूट (प्री-वेडिंग शूट) ऑपरेशन थिएटरमध्ये केल्याने येथील शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टरला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आणि काही वेळातच व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवर लोक संताप व्यक्त करताना दिसले.
व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्व काही खरे वाटेल –
व्हिडिओमध्ये डॉ. अभिषेक रुग्णावर शस्त्रक्रिया करताना दाखवण्यात आला आहे, तर त्याची मंगेतर त्याला बनावट ऑपरेशनमध्ये मदत करताना दिसत आहे. हे जोडपे वैद्यकीय उपकरणे वापरताना दिसतात आणि ऑपरेशन थिएटरचे दिवेही चालू आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की, एखाद्या रुग्णावर प्रत्यक्षात शस्त्रक्रिया होत आहे.
A doctor’s pre-wedding photoshoot in a govt hospital’s operation theatre in #Bharamasagar of #Chitradurga. Dr. Abhishek, a contract physician, performed a ‘surgery’ with his fiancee.
DHO says it was unused OT & issues notice to the administrator.#Karnataka #PreWeddingShoot pic.twitter.com/Eve0g3K9p1
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) February 9, 2024
यावेळी व्हिडिओमध्ये कॅमेरामन आणि तंत्रज्ञ हसताना पाहून सोशल मीडियावर लोक संतापले आहेत. व्हिडिओ पाहून असे दिसते की, फोटोशूटमध्ये विवाहित जोडपे हॉस्पिटलमध्ये काम करत आहे किंवा त्यांचा व्यवसाय औषधाशी संबंधित आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हिडीओचा शेवट “रुग्ण” शस्त्रक्रियेनंतर बसून हसत होता.
कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया…
या प्रकरणी कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्री ‘दिनेश गुंडू राव’ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितलं की, चित्रदुर्गातील भरमसागर सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये लग्नापूर्वीचे फोटोशूट करणाऱ्या डॉक्टरला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
ते म्हणाले की, शासकीय रुग्णालयांमध्ये असे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना मी यापूर्वीच दिल्या आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार अशा वैद्यकीय सुविधा पुरवते, हे सर्वांनी लक्षात ठेवावं, असं मंत्री म्हणाले.